अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी | Astitvavad aani marathi kadambari
Regular price
₹ 288
Sale price
₹ 288
Regular price
₹ 300
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Rekha Inamdar-Sane |रेखा इनामदार-साने |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी | Astitvavad aani marathi kadambari
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अस्तित्ववादी विचारसरणाने
क्रांतीच घडविली. या घटनेचे श्रेय कीर्केगार्ड, नीत्शे, यास्पर्स,
मार्सेल, हायडेगर, काम्यू व सार्त्र यांच्याकडे जाते.
अस्तित्ववादाने सुमारे चारेक दशके पाश्चिमात्य जगतातील
साहित्यनिर्मिती, समीक्षादृष्टी व कलाविचार यांवर आपली
कायमची मुद्रा उमटविली. दोन महायुध्दांच्या आसपासचे
राजकीय-सामाजिक वातवरण , स्तब्ध झालेला धर्मविचार,
उद्ध्वस्त समाजमानस आणि बेभरवशाचे व्यक्तिजीवन यांचा
अस्तित्ववादाच्या उदयाशी व विकासाशी जवळचा संबंध
आहे. १९६० ते १९८० या कालावधीत मराठी साहित्य व
समीक्षा यांवरही अस्तित्ववादाचा प्रभाव होता.
रेखा इनामदार-साने यांनी अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी
या ग्रंथामधून अस्तित्ववादाच्या उदयाशी तसेच जडणघडणीची
नेटकी मीमांसा केली आहे. तसेच आस्तिकता-नास्तिकता,
निवडीचे स्वातंत्र्य, परात्मता, असंगतता, अस्सल जीवनसरणी
इत्यादी अस्तित्ववादी आशयसूत्रांचा सप्रमाण उलगडा केला
आहे. तत्वज्ञान आणि साहित्य यांमधील परस्परसंबंधाची सूक्ष्म
चिकित्सा करून मराठी कादंबरीविश्वात मूलगामी परिवर्तन
घडविणा-या कोसला, बॅरिस्टर अनिरूध्द धोपेश्वरकर,
पुत्र, सात सक्कं त्रेचाळीस, एन्कीच्या राज्यात या
कादंब-याचे अस्तित्ववादाशी असणारे नाते त्यांनी
विश्लेषणपूर्वक स्पष्ट केले आहे. अस्तित्ववाद आणि कादंबरी
या दोहोंचे सांगोपांग विवरण करणारा हा
मराठीतील पहिला ग्रंथ आहे.
' 'Pages: 240
Weight:275
ISBN:978-81-7434-295-9
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2004
पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2004
Illustrator:सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.