नगरीपासून दूर अरण्याच्या मधोमध सारथ्याने रथ थांबवला, वृक्षराजीमधून चालण्यासाठी अधीरतेने सीता उतरली. सारथी लक्ष्मण रथातच बसला होता. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे जाणवून सीता थबकली. जमिनीकडे दृष्टी लावून शेवटी लक्ष्मण बोलला, "तुझा पती, माझा मोठा भाऊ, अयोध्येचा राजा राम याची इच्छा आहे की गावभर अफवा उठत आहेत. तुझ्या कीर्तीवर प्रश्नचि लागले आहे. याबाबतीत नियम स्पष्ट आहेतः राजाची पत्नी संशयाच्या पलीकडे असली पाहिजे. म्हणून रघुकुलाच्या वंशजाने तुला आज्ञा केली आहे की तू त्याच्यापासून, त्याच्या राजवाड्यापासून आणि त्याच्या नगरीपासून दूर राह्वंस. बाकी तुला आवडेल तिथे जाण्यास तू मुक्त आहेस. पण तू एकदा रामाची राणी होतीस हे तू कुणालाही उघड करून सांगणार नाहीस ." सीतेला लक्ष्मणाच्या नाकपुड्या थरथरताना दिसल्या. तिला त्याचं अवघडलेपण आणि संताप कळला. पुढे जाऊन त्याला आश्वस्त करावं असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला आवरलं. "रामाने त्याच्या सीतेला टाकलं आहे असं तुला वाटतय, होय ना ?' तिने मृदुपणे विचारलं."पण तसं करूच शकत नाही.तो देवी आहे - . तो कुणाचाच त्याग करत नाही.आणि मी देवी आहे -. कुणीच माझा त्याग करू शकत नाही."कोड्यात पडलेला लक्ष्मण अयोध्येला परतला. सीता वनात थांबली, हासील आणि तिने केस मोकळे सोडले.