Sahakardhureen
Regular price
₹ 329
Sale price
₹ 329
Regular price
₹ 340
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-82591-30-6 |
Author | Arun Sadhu |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 306 |
Edition | 1st |

Sahakardhureen
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
सहकारधुरीण₹. भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र अरुण साधू 'मुंबई दिनांक', 'सिंहासन' ,'तडजोड', 'त्रिशंकू', 'मुखवटा' इत्यादी सत्तेच्या राजकारणाच्या आणि बदलत्या समाजकारणाचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या गाजलेल्या कादंबर्यांरचे लेखक म्हणजे अरुण साधू. 'इंडियन एक्सप्रेस', 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव घेतला होता. त्यांची साम्यवादी क्रांतिकारकांवरची ललितेतर पुस्तकंही विशेष गाजली. त्यांनी 'डॉक्टर आंबेडकर' व 'यशवंतराव चव्हाण' यांच्या चरित्रपटांसाठी संवाद व पटकथालेखन केलं. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं तसंच त्यांना साहित्य अकदमी पुरस्कारही मिळाला होता. भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं… आणि त्यांच्याच सहभागाने ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये उभारला. कारखान्याच्या उभारणीसोबतच विठ्ठलरावांनी समाजविकास व शिक्षणप्रसाराच्या कार्याला चालना दिली आणि त्यामुळेच सहकारी कारखाना म्हणजे क्रांतिकारक बदलाचं प्रारूप ठरलं. त्याचं लोण केवळ पश्चिम महाराष्ट्रात पसरलं असं नाही, तर त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र बदललं. या प्रक्रियेत त्यांच्या सहकारी कारखान्याने उत्प्रेरकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला शेती-शक्तीचा आधार देण्यामध्ये विठ्ठलरावांचं योगदान मोठं ठरलं आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘सहकारधुरीण’ ठरतात. विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ ‘सहकारधुरीण’ महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा. ? , . :अरुण साधू :---- : : चरित्र-आत्मचरित्र, राजकीय , , चरित्र, राजकीय, लोकशाही, सामाजिक
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.