Khara Sangaycha Tar
Regular price
₹ 242
Sale price
₹ 242
Regular price
₹ 250
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-86493-23-1 |
Author | Karan Johar |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 228 |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |

Khara Sangaycha Tar
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
खरं सांगायचं तर…₹. (मराठी अनुवाद) करण जोहर अनुवाद : नीता कुलकर्णी खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…! अशा पार्श्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘ ’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन! – प्रदीप चंपानेरकर (प्रकाशक) ———- “पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. आता एका अर्थाने, यश आणि अपयश याबाबतीत माझ्या भावना बधीर झाल्या आहेत.” “माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.” “रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.” “मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट’ दिग्दर्शक बनायचं होतं.” “मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.” “आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.” “मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.” “व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.” ? , . :करण जोहर, नीता कुलकर्णी :---- : : चरित्र-आत्मचरित्र, चित्रपट - संगीत अनुभवपर, अनुवादित, आत्मकथन
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.