Look Inside
Kconnections
share-Icon
Kconnections

Kconnections

Regular price ₹ 266
Sale price ₹ 266 Regular price ₹ 275
Unit price
Save 3%
3% off
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

Dedicated Support

Kconnections

Kconnections

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
के कनेक्शन्स₹. लेखक : प्रणव सखदेव ‘यात जगाचे तडाखे बसूनही अबाधित राहिलेली निरागसता आहे… एक रसरशीत आणि जिवंत पुस्तक… निखिलेश चित्रे ‘या पुस्तकातील घटना, पात्रं पकड घेतात. या विश्वात रमायला होतं…. हृषीकेश गुप्ते   प्रत्येकाच्या सफरनाम्यातली एक फेज… अशी अडनिडी… धड न लहान राहिल्याची नी धड न मोठं झाल्याची! काय नाही अनुभवत या गोंधळाच्या, तगमगीच्या, हरवलेपणाच्या आणि गवसलेपणाच्याही काळात ? पहिला बेस्ट फ्रेन्ड… शाळेत घडलेलं एखादं डेजर कांड… क्रिकेटच्या ग्राऊंडवरचं पडीक राहाणं.. लायब्ररीतल्या पुस्तकांचा तो गंध… आज्जी-आजोबांचा लोण्यासारखा मायेचा मऊ स्पर्श… शेजारच्या दादाचं गच्चीवरचं अफेअर… आणि अनुभवलेला पहिला-वहिला ब्रेकअप… असे काही चमकते तर काही काळ्या करड्या शेडचे तुकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. अशा काही तुकड्यांचाच हा ओढाळवाणा सफ़रनामा ! के फॉर कुमार… के फॉर कल्याण….के कनेक्शन्स   के कनेक्शन्स ? , . : : :---- कथा-कादंबरी, नवी पुस्तकं , , , , , , कल्याण, किशोरसाहित्य, कुमार गट, दोस्ती, प्रेम
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Based on 1 review
100%
(1)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
B
Bookbandhu Reviews (Omkar Bagal)
के कनेक्शन्स - प्रणव सखदेव (पुस्तक परीक्षण - ओंकार बागल)

के कनेक्शन्स - प्रणव सखदेव
पुस्तक परीक्षण - ओंकार बागल

आपण एखादं रोपटं लावतो, त्याला रोज पाणी देतो, त्याला निसर्गाचा सूर्यप्रकाश मिळतो, ते हळूहळू वाढू लागतं. आपण कुंडीतल्या रोपट्याला उंदरा-मांजरांपासून वाचवतो, बाहेर कुठे लावलं असेल तर इतर कुणाकडून इजा होणार नाही याची काळजी घेतो. मग ते रोपटं आणखी वाढायला लागतं, बहरायला लागतं. कुंडी किंवा छोटीशी जागा त्याला अपुरी पडू लागते, तेव्हा आपण ते कुठल्यातरी मोठ्या जागी हलवतो आणि काही वर्षांनी ते झाड बनतं. आणखी काही वर्षांनी त्याचं एखाद्या भल्यामोठ्या वृक्षात रूपांतर होतं. हा प्रवास..त्या रोपट्याचा..रोपट्यापासून वृक्षात झालेल्या संक्रमणाचा. तो संक्रमणाचा काळ..हा काळ त्या रोपट्याने स्वतः जगलेला असतो. अनेक वर्षांचा कालावधी असल्याने त्या रोपट्याव्यतिरिक्त कुणाला हा काळ जाणवला असेल का?

आपणही जेव्हा बालवयापासून कुमारवयात आणि कुमारपासून तरुणवयात येत असतो तेव्हा कळत-नकळत संक्रमित होत असतो. होय, संक्रमितचं! आपण नुसतेच वाढत नसतो. वाढ होताना कित्येक जाणिवा घेऊन लांबत जात असतो. मात्र त्या जाणिवाही अपुऱ्याचं आणि ते वाढणंदेखील अपुरचं. या जाणिवा..संक्रमित होत असतानाच्या जाणिवा. खूप काही दडलंय या साऱ्यात.

या नेमक्या गोष्टीचा ठाव घेऊन लेखक प्रणव सखदेव यांनी ही कादंबरी लिहिली आहे. के कनेक्शन्स, के फॉर कुमार.. के फॉर कल्याण. कुमार वयात होत असतानाच्या जाणिवा, हा या कादंबरीचा मूळ आशय आहे. आपण बऱ्याचदा अनेकांकडून एक वाक्य ऐकतो, "तेव्हा मी लहान होतो रे, त्या वयात कुठे नीट कळतं कुणाला?" हाच तर गाभा आहे या के कनेक्शन्सचा, ना धड कळतंय, न धड समजतंय. बस्स हलकं हलकं काहीतरी उमगतंयं. पण त्याचं काही कनेक्शन लागेना. कदाचित त्या वयात ते लावता येईना. हे वयचं असं अडनिड् आहे त्यामुळे बहुदा ताळमेळ लागेना. कादंबरीतील नायक कुमार याचसुद्धा  कदाचित काहीसं असंच झालंय. लेखकांनी ही कादंबरी 'मोझाइक नॉव्हेल्स' या प्रकारात लिहिली आहे. एक एक मोती ओवून बनवलेला 'मोत्यांचा हारचं' जणू.

ही कादंबरी खरं तर नॉस्टॅल्जिया आहे, क्षणाक्षणाला लहानपणात घेऊन जाते. अर्धवट परिपक्व झालेल्या वयाची सारी चित्रे डोळ्यासमोर उभी करते. या कादंबरीत नुसतं बालपण चितारलेलं नाहीये, तर प्रत्येक पानासरशी एक संवेदना जागवलेली आहे. एक अशी सुप्त संवेदना जी आपण सर्वांनी आपल्या लहानपणी अनुभवली आहे, जगली आहे. कुमार वयात पुन्हा पुन्हा डोकावून, त्या साऱ्या भावना आठवून, साचेबंध करण्याचा हा खटाटोप निराळा आहे. कादंबरीचा विषय जितका रम्य, भावनिक आणि रंजक आहे तितकाच तो अंतरंगातील गूढ विश्वाचा आहे. एक असं विश्व जे कुमारवयात प्रत्येकाने स्वतः निर्माण केलं होतं. अचानक आपण मोठे होऊन बसलो आणि कुठल्यातरी कृत्रिम जगात वावरू लागलो. ही कादंबरी आपल्याला स्वतःच्या खऱ्या विश्वाशी पुन्हा एकदा भेट घालून देते. आपल्याला ओरडून सांगू पाहते, "हा खरा तू आहेस."

के कनेक्शन्स.. खरंच खूप कनेक्शन्सची ऊहापोह केली आहे यातून. माणसांची, जागांची, ठिकाणांची, प्रवासांची, वस्तूंची, खाद्यपदार्थांची, खेळणांची, भावनांची आणि जाणिवांची. यातली कनेक्शन्स वाचताना, आपल्याला आपली कनेक्शन्स आपोआप आठवू लागतात. आजच्या विशीतल्या आणि तिशीतल्या तरुणाईला अक्षरशः भारावून टाकणारी कादंबरी आहे ही. यातून विचारात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'काळ'. बोरकूट,

के कनेक्शन्स ही कादंबरी आणखी बऱ्याच गोष्टींवर भाष्य करत राहते. सामाजिकदृष्ट्या माणूसकी आणि बांधिलकी यावर पुरेपूर प्रकाश टाकते. जेव्हा घरांच्या भिंती एकमेकांना लागून होत्या तेव्हा माणसांतलं माणूसपण कशाप्रकारे जपलं जात होतं, हे कडबोळी मावशी आणि भाजीवाली अक्का यांच्या माध्यमातून समजून येतं. नव्वदीच्या दशकातील आर्थिक परिस्थितीचे केलेले विवरण हे एकप्रकारचे चिंतन आहे. चांगल्या, वाईट, नाजूक, बिकट आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णन दिन्या, मन्या आणि कुमारच्या निमित्ताने होत राहते.

त्या वयात प्रत्येकाला क्रिकेटर व्हायचं असतं, सपशेल वेडेपिसे होऊन झालेलो असायचो आपण क्रिकेटसाठी. अलगदपणे हे क्रिकेटचं वेड कमी होऊ लागतं, त्याची जागा दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीने घेतलेली असते. शाळा, शिक्षक हेदेखील तितकेच महत्वाचे ठरतात या बदलाला, जसं कुमारसाठी साळुंकेबाई ठरल्या. एखादा प्रसंगदेखील पुरेसा असतो, आयुष्यातल्या या बदलासाठी. त्या निरागस वयातसुद्धा आपण काही कांड केलेली नसतील तर मग त्यात मजा कसली, नाही का?

फेसाळलेलं ते वय, ती अवस्था बऱ्याच अंशी आकर्षित करते. घरच्यांशिवाय आयुष्यात आलेले मित्र आणि माणसं आपल्या जगण्याची परिभाषा पदोपदी बदलत जातात. त्यांच्याशी बनलेलं नातं, आपल्यालाही आकार देत राहतं. ही माणसं म्हणजे कवडशासारखी असतात, के कनेक्शन्समधून ती पुरेपूर अनुभवता येतात. या मोझाइक नॉवेलमध्ये १२ कहाण्या आहेत, ज्या एकमेकांशी सांधलेल्या आहेत. कादंबरीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कल्याणमधील १५-२० वर्षांपूर्वीच्या ठिकाणांची केलेली वर्णने आणि त्या स्थळांच्या नावामागची कारणे. वर्षानुवर्षे कालातीत राहणाऱ्या साहित्यात सामाविष्ट होऊ घातलेल्या लिखाणापैकी हे एक लिखाण आहे. कारण काळ पुढे जात राहतो, त्यावर अशा प्रकारच्या साहित्याचा ठसा उमटत जातो. बदलत्या काळातही अबाधित राहणारी संवेदना..एक अचेतन भावना म्हणजे के कनेक्शन्स.

वाढत्या वयातल्या, कोवळेपणातून जाणतेपणात रुपांतरित होण्याच्या. या अड्यानिड्या वयात तग धरून राहिल्याच्या, टिकून राहिल्याच्या. तेही अगदी डार्विनच्या 'सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट'च्या सिद्धांताला धरून. कारण या वयात योग्य दिशेने वाटचाल करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आयुष्यात जोडलेले कनेक्शन्स खूप मदत करतात. कादंबरी वाचताना या गोष्टीची सतत जाणीव होत राहते. अशी ही अतिशय रंजक आणि तितक्याच प्रभावी वैशिष्ट्यपूर्ण धाटणीच्या कथा असलेली कादंबरी..एक नवी कोरी मोझाइक नॉवेल..म्हणजे के कनेक्शन्स.

-©ओंकार दिलीप बागल
9321409890
[****]
Insta ...

Related Products

Recently Viewed Products